पाटणा – बिहारमध्ये सध्या एका अनोख्या चोरीची जोरदार चर्चा सुरु आहे. रोहतास येथे ५०० टन वजनाचा लोखंडी पूल चोरल्यानंतर चोरट्यांनी आणखी एक मोठी चोरी झाली आहे.या चोरीबद्दल ऐकून कुणालाही नक्कीच धक्का बसेल.या चोरट्यांनी भुयार खोदून रेल्वेचे अख्खे इंजिनच पळवल्याची घटना उघड झाली आहे. इतकेच नाही तर या चोरांनी ते इंजिन विकूनसुद्धा टाकले.
बिहारमधील या अजब चोरीची घटना ऐकून पोलिसही चक्रावले आहे. मुझफ्फरपूर येथे भंगाराच्या दुकानात एका बॅगमध्ये इंजिनचे काही सुटे भाग सापडले.त्यानंतर ही चोरीची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तीन लोकांना अटक केली होती. त्यानंतर माहितीच्या आधारे मुझफ्फरपूर येथील प्रभात कॉलनीतील भंगाराच्या गोदामात जाऊन इंजिनच्या सुट्टे भाग भरून ठेवलेल्या १३ गोण्या जप्त केल्या.एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की,आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आम्हाला यार्डाजवळ एक भुयार सापडला आहे.ज्यामधून हे चोरटे यायचे आणि इंजिनचे पार्ट गोण्या भरून घेऊन जायचे.रेल्वे अधिकाऱ्यांना तर त्याबाबतची काहीच माहिती नव्हती,असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
काही दिवसांपूर्वी पूर्णि या जिल्ह्यातही अशीच एक चोरी घटना घडली होती. चोरांनी विंटेज मीटर गेज स्टीम इंजिन विकलं होतं. स्थानिक रेल्वे स्थानकात हे इंजिन प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मात्र, चौकशी केल्यानंतर हे इंजिन चोरी गेल्याचे दिसून आले. समस्तीपूर डिव्हिजनच्या डिव्हिजनल मॅकेनिकल इंजिनियरकडून देण्यात आलेल्या बनावट पत्राच्या आधारे हे इंजिन विकण्यात आले आहे.तसेच काही दिवसांपूर्वी बिहारच्या उत्तर पूर्वेकडील अररिया जिल्ह्यातील सीताधार नदीवरील पुलाचे कुलूप चोरांनी उघडले होते. त्यानंतर या पुलाचे काही भाग चोरांनी गायब केले होते.त्यानंतर आता हा दुसरा धक्कादायक प्रकार उजेडात आल्याने बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.