संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

बिहारमध्ये तरुणीने ‘मनुस्मृती’ जाळत सिगारेट पेटवली, मटणही शिजवले!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पटना : ‘रामचरित मानस’नंतर बिहारमध्ये आता ‘मनुस्मृती’वरून वाद पेटला आहे. शेखपुरा येथील प्रिया दास या तरुणीने ज्या चुलीवर चिकन शिजवले त्याच चुलीवर ‘मनुस्मृती’ जाळत त्यावर सिगारेट पेटवली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही लोक या तरुणीच्या समर्थनार्थ कमेंट करत आहेत, तर काही लोकांकडून जाणून बुजून हा व्हिडिओ शेअर केला जात असून, यामुळे हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न असल्याच्या कमेंट समोर येत आहेत.

या तरुणीचे नाव प्रिया दास आहे. ही राष्ट्रीय जनता दलाची महिला सचिव आहे. ‘मनुस्मृती’ हा फडतूस ग्रंथ असून हा ग्रंथ कुठल्यातरी एका जातीला परमेश्वर असल्याचे प्रमाणपत्र देतो. समाजाला जोडण्याचे नव्हे, तर तोडण्याचे काम ‘मनुस्मृती’ करतो. म्हणूनच मला तो जाळून टाकावा असे वाटल्याचे प्रिया दास हिने सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये प्रिया दास म्हणते, “मनुस्मृती जाळणे हे कोणा एका व्यक्तीविरुद्ध नाही तर माझा हेतू समाजातील ढोंगी आणि दांभिक विचारांवर हल्ला करणे हा आहे. दरम्यान, बिहारचे शिक्षणमंत्री डॉ. चंद्रशेखर यांनीही ‘मनुस्मृती’ व ‘रामचरित मानस’ हे दोन्ही ग्रंथ समाजात द्वेष पसरवत असल्याचे म्हणत प्रिया दास या तरुणीचे समर्थानच केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या