संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

बिहारमध्ये नकली पोलिस ठाणे ५०० रुपये रोजंदारीवर भरती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पाटना – आजवर आपण बोगस पोलिसांच्या अनेक घटना पाहिल्या होत्या. मात्र बिहारमध्ये चक्क बोगस पोलिस ठाणे उघडले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बांका गावात हे पोलिस स्टेशन असल्याचे आणि तेथे काम करणाऱ्या पोलिसांना रोज ५०० रुपये रोजंदारी मिळत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यात एका तरुणीचाही समावेश आहे.
बिहारच्या बांका गावात पोलिसांनी बुधवारी छापे घातले. त्यात अनुराग गेस्ट हाऊसमध्ये बोगस पोलिस ठाणे सुरू असल्याचे उघडकीस आले. तेथे वर्दीतील नकली पोलिस तरुणाला आणि तरुणीला पोलिसांनी अटक केली. अनिता देवी असे या तरुणीचे नाव आहे. तिच्याकडे दोन गावठी पिस्तुले सापडली. या पोलिस स्टेशनमध्ये नकली लेखपाल होता. त्याच्याकडे काही कागदपत्रे सापडली. या प्रकारामुळे सरकारी अधिकारीही चक्रावले. हे पोलिस ठाणे चालवणारा मुख्य आरोपी फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami