बीजिंग – चीनच्या स्पेस ट्रान्सपोर्टेशन या कंपनीने बुंबाट विमान तयार केले असून हे विमान रॉकेट हवेमध्ये जसं झेपावतं, त्याच पद्धतीने हे विमान हवेत झेपावते. बिजिंगपासून अमेरिकेतील न्यूयॉर्कपर्यंतचं अंतर हे विमान फक्त 1 तासात गाठू शकतं असा दावा करण्यात आला आहे. 2024 पर्यंत हे विमान उड्डाणासाठी सज्ज असेल असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. हे विमान तयार केलं आहे.
या विमानाचा एक व्हिडीओ कंपनीने नुकताच शेअर केला आहे. अंतराळात सोडण्यात येणारी अंतराळयाने काही अंतर पार केल्यानंतर त्याला वेग देणारी रॉकेट यानापासून वेगळी होत असतात. चिनी कंपनीने तयार केलेल्या विमानामध्येही तशीच यंत्रणा असणार आहे. सदर विमान हे पंख असलेलं रॉकेट असल्याचं कंपनीने म्हटलंय. या विमानाने एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत उपग्रह वाहून नेणाऱ्या रॉकेटच्या तुलनेत कमी खर्चात पोहोचता येईल असा दावाही या कंपनीने केला आहे. चीन सातत्याने हवाई क्षेत्रात नवनवे प्रयोग करत असून त्यासाठी बराच पैसा खर्च केला जात आहे.