संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

बीडमध्ये पंकजा मुंडेेंचा धनंजय मुंडेेंना धक्का; पाच पैकी 3 नगरपंचायती घेतल्या ताब्यात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीड- बीडमध्ये पुन्हा एकदा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बाजी मारली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना धक्का दिला आहे. जिल्ह्यातील पाच नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भाजपाने वर्चस्व राखले. वडवणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर केजमध्ये आघाडी आणि आष्टी, पाटोदा शिरूरमध्ये भाजपने बाजी मारली आहे. प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या वडवणी नगरपंचायतीत भाजपाचे सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.

पाच नगर पंचायतीसाठी गेल्या महिन्यात निवडणूक पार पडली होती. यामध्ये तीन नगरपंचायतींमध्ये भाजपने तर केजमध्ये जनविकास आघाडी आणि वडवणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. त्यानंतर आज सोमवारी नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. यावेळी आष्टी नगरपंचायत नगराध्यक्षपदी पल्लवी धोंडे यांची बिनविरोध तर उपनगराध्यक्षपदी शैलेश सहस्त्रबुद्धे यांची बिनविरोध निवड झाली. पाटोदा नगरपंचायत नगराध्यक्षपदी सय्यद खतीजाबी सय्यद अमर यांची तर उपनगराध्यक्ष शरद बांदळे यांची निवड झाली. केजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवून काँग्रेसने स्थानिक जनविकास आघाडीसोबत हातमिळवणी केल्याने येथे काँग्रेसने सत्ता मिळवली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, बीडमधील लढत मुंडे विरुद्ध मुंडे अशी नव्हती. सत्ता असूनही यश मिळवण्यात सत्ताधारी कमी पडले. लोकांनी भाजपाला पहिली पसंती दिली आहे. एका मतदारसंघाचे नेतृत्व आणि जिल्ह्याचे पालकत्व यात फरक आहे. लोकांचा गेल्या अडीच वर्षातील कामकाजाचा राग आणि आमच्या काळातील कामकाजाची पावती असा तो निकाल आहे. बीडमधील लोकांनी भविष्यात काय चित्र असेल हे दाखवले असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami