संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 02 December 2022

बीडमध्ये विजेचा करंट लागून ८ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीड – घराच्या अंगणात लहान मुलासोबत खेळत असताना आदेश राठोड या ८ वर्षांच्या बालकाचा पत्र्याच्या शेडला हात लागला आणि करंट लागून त्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील गोळेगाव तांडा येथे घडली.

आदेश राठोड हा गोळेगाव तांडा येथे राहतो. त्याचे आई-वडील ऊसतोड कामगार आहेत आणि ते ऊस तोडणीच्या कामासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये जातात. आदेश आणि त्याचा भाऊ हे आजी-आजोबा यांच्याकडे शालेय शिक्षण घेण्यासाठी राहत असत. काल सकाळी इतर मुले खेळत असताना आदेशचा हात अचानक त्यांच्या पत्र्याच्या शेडला लागला आणि आदेश राठोड याचा जागीच मृत्यू झाला आहे. आजूबाजूचे लोक धावत आले, पण नेमके काय झाले हे कळण्याच्या आतच आदेश खाली कोसळला. तो पुन्हा उठलाच नाही.

दरम्यान आई वडील आल्यानंतर उशिरा आदेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र बीड जिल्ह्यातील बहुतांश लोक ऊस तोडणी करण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागात जातात. वर्षातील किमान चार ते सहा महिने हे मजूर आपल्या मुलांपासून दूर ऊसाच्या फडावर राहतात. त्यामुळे यांची मुले त्यांच्या आजी-आजोबांसोबत गावी राहतात.

वयस्कर आजी-आजोबा या मुलांचे संगोपन करतात. पण त्या दिवशी आदेश इतर मुलासोबत खेळत असताना त्याचा हात पत्र्याच्या शेडला लागला, त्या पत्र्याच्या शेडमध्ये करंट आहे याची कल्पना तिथे कोणालाच नव्हती. त्यामुळे अचानक पत्र्याच्या शेडमध्ये करंट कसा उतरला हे कळू शकले नाही. करंट लागून आदेश जमिनीवर कोसळल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्याला उठवायचा प्रयत्न केला. पण विजेचा धक्का इतका जोरात बसला होता की आदेश पुन्हा जागेवरुन उठू शकला नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami