संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

बीड जिल्ह्यातील १२३ गावातील शेकडो जनावरे लम्पीच्या विळख्यात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीड – जिल्ह्यातील शेकडो जनावरे लम्पीच्या विळख्यात सापडले आहेत.आतापर्यंत बीड जिल्ह्यातील १२३ गावातील ५४८ जनावरांना लम्पीची लागण झाली असून ४१२ जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत.तर त्यापैकी १५ जनावरांचा मृत्यू झाला असून १२१ जनावरे उपचाराखाली आहेत.यातील मृत जनावरांच्या भरपाईपोटी ३ पशुपालक शेतकऱ्यांना आतापर्यंत शासनाने मदत केली आहे.
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या धसवाडीत गेल्या महिनाभरापूर्वी जनावरांमध्ये आढळणाऱ्या लम्पी या संसर्गजन्य आजाराने बाधित दोन जनावरे आढळले होते. यानंतर जिल्ह्यात हळूहळू सर्वच तालुक्यांत लम्पी आजाराचा संसर्ग झाला. याचा प्रसार आता वाढू लागला असून अनेक जनावरे लम्पीच्या विळख्यात सापडली आहेत.यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या काल सोमवारच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील १२३ गावांत लम्पीचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत ५४८ जनावरे यामुळे बाधित झाले आहे. उपचारानंतर ४१२ जनावरे पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या १२१ जनावरांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, यातील ९६ जनावरांमध्ये सौम्य लक्षणे आहेत,१६ जनावरांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत.तर ९ जनावरांची स्थिती गंभीर आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami