संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

बुरखाधारी प्रेमवीराला मुले पळवणारा चोर समजून जमावाने बेदम चोपले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – बुरखा घालून प्रेयसीला भेटण्याची युक्ती नाशिकमधील प्रेमवीराच्या चांगलीच अंगलट आली. मुले पळवणारा चोर समजून जमावाने त्याला बेदम चोपले. ही घटना वडाळा गावात घडली. मुले पळवणारी टोळी आल्याच्या संशयातून नाशिकमध्ये घडलेली ही दुसरी मारहाणीची घटना आहे.

नाशिकमध्ये मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा काही दिवसांपासून पसरली आहे. त्यातून नाशिकच्या वडाळा गावात बुरखाधारी तरुणाला मुले पळवणारा चोर समजून जमावाने बेदम मारहाण केली. हा तरुण बुरखा पांघरून प्रेयसीला भेटण्यासाठी जात होता. परंतु लोकांना तो मुले पळवणारा चोर असावा, असे वाटल्यामुळे त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. यापूर्वी नाशिकमधील सिडकोच्या राणा प्रताप चौकात पोलिसांसमोरच भीक मागणाऱ्या महिलेला जमावाने मारहाण केली होती. मुले पळवणाऱ्या टोळीची सदस्य असल्याच्या संशयावरून जमावाने तिला मारहाण केली होती. त्यानंतर वडाळ्यात तरुणाला मुले पळवणारा चोर समजून जमावाने मारहाण केली. याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. नाशिकमध्ये मुले पळवणारी कोणतीही टोळी सक्रिय नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवून नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. मुले पळवणाऱ्या टोळीची अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami