संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

बुलेट ट्रेनसाठी ठाण्यात शंभर टक्के भूसंपादन पोलीस बळाचा वापर! बांधकामे ताेडून दिला ताबा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला आता गती मिळू लागलीय. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील २२ हेक्टर ४८ आर जमिनीचे १०० टक्के भूसंपादन गुरुवारी पूर्ण करण्यात आले. जमिनीचा ताबाही नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशनकडे देण्यात आला आहे. मात्र रहीवाशांकडून विरोध होत असतानाही पोलीस बाळाचा वापर करत काही गावात असलेले अतिक्रमण हटवून बुलेट ट्रेनचा मार्ग सुकर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबाबतचे वृत्त असे की, ठाणे शहरातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमिनीचा ताबा शुंभर टक्के पूर्ण झाला आहे. त्यामुळे मार्गही मोकळा झाला आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडे जागेचा ताबा देण्यात आला आहे. त्यासाठी मौजे आगासन, म्हातार्डी, बेतवडे, डावले, पडले, शिळ व देसाई आदी ठिकाणचे अतिक्रमण तत्काळ पाडून बुलेट ट्रेनचा मार्ग सुकर केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी दिली. ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा खुला ताबा नॅशनल हायस्पीड रेल कॉपोर्रेशनला ३० सप्टेंबरपर्यंत देण्याचे आदेश जारी झाले होते. त्याची गांभीर्याने दखल घेत अतिक्रमण, निवासी घरे, गाळे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. यामध्ये १२ बांधकामे ही चार सर्वे नंबरमधून तोडली. तर बुलेट ट्रेनकरिता लागणाऱ्या जमिनीचा ताबा संबंधित अधिकाऱ्यांना गुरुवारी देण्यात आला. या रेल्वे प्रकल्पासाठी जमिनीच्या भोगवटादारांकडून जमिनी घेऊन त्या बुलेट ट्रेन प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यासाठी प्रकल्पाच्या समिती प्रमुखांसह नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, ठाणे समिती उपप्रमुख, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी आदी यंत्रणा या गावांमध्ये तैनात करून जागा मोकळी केल्याचे शिंदे यांनी सांगितले. या रेल्वे प्रकल्पासाठी लागणाऱ्या भूखंडावर वसलेल्या रहिवाशांकडून प्रशासनाला कडाडून विरोध झाला. मात्र, पोलीस बळाचा वापर करून यावर मात करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami