संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

बेपत्ता जुल्फिकारचा शोध घ्या एकता कपूरचे केंद्रला साकडे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – निर्माती-दिग्दर्शक एकता कपूरच्या बालाजी टेलीफिल्मचे माजी सीओओ जुल्फिकार खान गेल्या जुलैत नैरोबीतून बेपत्ता झाले आहेत. अनेक महिने झाले तरी ते सापडत नाहीत. तेव्हा केंद्र सरकारने त्यांचा शोध घ्यावा, अशी विनंती एकता कपूरने केंद्र सरकारला केली आहे.
ट्रिपल एक्स वेब सिरीजमुळे अडचणीत सापडलेल्या एकता कपूरच्या बालाजी टेलीफिल्मचे जुल्फिकार खान नैरोबीला गेले होते. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात तेथून ते बेपत्ता झाले. त्यानंतर अनेक महिने झाले तरी त्यांचा शोध लागत नाही. त्यांचे काय झाले ते कळत नाही. तेव्हा भारत सरकार आणि मानवतावादी संस्था केनिया रेड क्रॉसने त्यांना शोधण्यासाठी मदत करावी, असे आवाहन एकता कपूरने केले आहे. इंस्टाग्रामवर तिने जुल्फिकार खानचा फोटो शेअर करून मदतीसाठी आवाहन केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami