संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

बेपत्ता झालेल्या पणन महासंचालक घोरपडेंचा मृतदेह नदीत सापडला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा- मूळचे साताऱ्याचे असलेले ,राज्याच्या पणन विभागाचे सह संचालक शशिकांत पतंगराव घोरपडे (५०) हे पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणा-या सारोळा पुलाजवळून बेपत्ता झाल्याने पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.घोरपडे यांनी नीरा नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची शक्यता असल्याने तपास गुरुवारी रात्रीपासून सुरु होता.अखेर आज त्यांचा मृतदेह साताऱ्यातील नीरा नदीपात्रात सापडला असून एनडीआरएफच्या पथकाला यश मिळाले आहे.या घटनेचा अधिकचा तपास सुरु आहे.
शशिकांत घोरपडे हे बुधवारी दुपारी आपल्या पुण्यातील शासकीय कार्यालयातून प्रदीप मोहिते या आपल्या मित्राच्या कारने साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. त्यानंतर ते सारोळा- शिदेंवाडी गावच्या हद्दीतील नीरा नदी जवळच्या हॉटेल वेगास येथे आले. त्याठिकाणी त्यांनी
आपली कार पार्क केली.तिथे चहा घेतला आणि ते पायीच नीरा नदीवरील पुलाच्या दिशेने गेले असे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधून समोर आले आहे.नदीजवळ आल्यानंतर ते बेपत्ता झाल्याने त्यांनी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली असावी,अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे गुरुवारी रात्रीपासून नीरा नदीपात्रामध्ये युद्धपातळीवर शोध कार्य सुरू झाले. त्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. घोरपडे हे नेहमी कार्यालयातून साडेपाच वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील घरी येत असत.मात्र बुधवारी उशिरपर्यंत ते घरी न आल्याने व त्यांचा मोबाईल बंद येत असल्याने त्यांच्या पत्नीने शशिकांत यांच्या बंधूंना याबाबतची कल्पना दिली. त्यांनी कार्यालयात चौकशी केली असता शशिकांत हे साडे तीन वाजण्याच्या दरम्यान कार्यालयातून गेल्याची माहिती मिळाली. त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतर आज अखेर एनडीआरएफ पथकाच्या शोधकार्याला यश मिळाले असून घोरपडेंचा मृतदेह नीरा नदीपात्रात सापडला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami