संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

बेस्टचे ई बस कंत्राट रद्द करा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – बेस्टने ईव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलेले 2100 ई बसचे कंत्राट रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी विनंती भाजपा नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.
बेस्टने नव्या 2100 ई बस खरेदी करण्याचे कंत्राट ईव्ही ट्रान्स प्रा. लि. या कंपनीला दिले असून हे कंत्राटाची निविदा प्रक्रिया चुकीची असल्याची टिप्पणी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. त्यानंतरही बेस्टने सदर कंत्राट रद्द केलेले नाही. त्यामुळे याबाबत पुढील कार्यवाही न करता हे कंत्राट रद्द करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती आमदार अ‍ॅड. शेलार यांनी पत्राद्वारे केली आहे.
उलट उच्च न्यायालयाच्या या निकालानंतरही बेस्ट व्यवस्थापन सदर कंपनीलाच कंत्राट मिळावे म्हणून मदत करीत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे ही बाब गंभीर असून शासनाने तातडीने या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी विनंती आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami