संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

बेस्ट उपक्रमाची दसर्‍यानिमित्त ऑफर 19 रुपयांत प्रवाशांना 10 फेर्‍यांची सेवा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- डिजिटल बस प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी नवरात्रच्या पूर्वसंध्येला बेस्ट उपक्रमाकडून विशेष दसरा ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. केवळ 19 रुपये भरुन खरेदी केलेली सदर ऑफर खरेदी दिनांकापासून 9 दिवसांकरीता वैध असून याद्वारे प्रवाशांना 10 प्रवास फेर्‍यांचा लाभ मिळणार आहे. नव्या आणि जुन्या ‘बेस्ट चलो अ‍ॅप’ धारकांना या सुविधेचा केवळ एकदाच लाभ घेता येणार असून अधिकाधिक मुंबईकर प्रवाशांनी सुलभ अशा डिजिटल प्रवासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.

ही ऑफर मिळविण्यासाठी प्रवाशांनी ‘बेस्ट चलो अ‍ॅप’ डाऊनलोड करुन बस पास स्टेशनमध्ये जाऊन ‘दसरा ऑफर’ निवडावी. प्रवाशांनी आपला तपशील भरुन 19 रुपये ऑनलाईन प्रदान करावे. बसमध्ये चढल्यावर ‘स्मार्ट अ ट्रीप’वर टॅप करुन मोबाईल फोन बस वाहकाच्या मशीनजवळ धरुन तिकीट वैध करावे. त्यानंतर प्रवासासाठी डिजिटल पावती अ‍ॅपवर मिळेल. या योजनेमध्ये प्रवाशी कोणत्याही बस मार्गावर 9 दिवसांच्या कालावधीत विमानतळ, हॉन ऑन-हॉन ऑफ अशा विशेष बससेवा वगळता एसी आणि बिगर एसी बस गाड्यांद्वारे प्रवास करु शकतील. ही योजना 26 सप्टेेंबरपासून 5 ऑक्टोबर या कालावधीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami