मुंबई – बेस्ट बसेसमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता आता प्रवाशांचा प्रवास तिकीट लेस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ‘चलो अँप’वरुन वाहकाला पैसे दिल्यास मोबाईलवरच तिकिट दिसणार आहे. तसेच पास दाखवल्यावरही मोबाईलवर तिकीट दिसणार आहे. ‘चलो ॲप’ ही सुविधा उपलब्ध झाल्यापासून दीड लाखांहून अधिक प्रवाशांनी या नवीन प्रणालीला पसंती दिली आहे.
बेस्ट उपक्रमाने ‘चलो ॲप’ सुरु केले असून हे ॲप सलग्न असलेल्या मोबाईल बॅलेटमधून अथवा कार्डमधून पैसे अदा करुन तिकीट विकत घेता येते. आतापर्यंत हे तिकीट दाखवल्यावर प्रवाशांच्या विनंतीवर वाहक प्रवाशांना पूर्वी प्रमाणे कागदी तिकीट देण्यात येत होते. मात्र, 14 फेब्रुवारीपासून ही पध्दत बंद होणार आहे. ऑनलाईन तिकीट काढणाऱ्यांना पूर्वी प्रमाणे कागदी तिकीट देणे बंद करण्यात येणार आहे, असे बेस्ट उपक्रमाकडून कळविण्यात आले आहे. या ॲपसोबत पासही जोडलेला असणार आहे.
या मोबाईल ॲप्लिकेशनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेस्ट मधून सरासरी 24 लाख हून अधिक प्रवासी रोज प्रवास करत आहेत. त्यातील 5 लाख 25 हजार प्रवाशांनी ‘चलो अॅप’ डाऊनलोड केले आहे. त्यातील 1 लाख 50 हजार प्रवासी ‘चलो अप’ आणि स्मार्ट कार्डद्वारे बेस्ट तिकीट पास घेऊन बसमध्ये प्रवास करतात.