संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

बोईंगची अमेरिकेत नोकरकपात
भारताला मिळणार काम!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शिकागो : बर्‍याच कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी केली आहे. डेलमधूनही ६,६५० नोकऱ्या कमी करण्याचे वृत्त समोर आले आहे. आता अमेरिकेची विमान निर्मिती कंपनी बोईंगकडून नोकर कपात होणार आहे. बोईंगकडून अमेरिकेत वित्त आणि एचआर विभागातील २,००० व्हाईट कॉलर नोकऱ्या कमी करणार असल्याची घॊषणा बोइंगकडून करण्यात आली आहे.
बोईंगने फायनान्स आणि ह्युमन रिसोर्सेस विभागातील २,००० नोकऱ्या कमी करणार असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. आर्लिंग्टन, व्हर्जिनिया येथे बोइंग कंपनीचे मुख्यालय आहे. या कंपनीने २०२२ मध्ये १५,००० लोकांना कामावर घेतल्यानंतर आता २०२३ मध्ये १०,००० कामगारांची भरती केली जाणार असल्याचेही घोषणा केली होती. मात्र या घोषणेननंतर कोणतीही भरती होणार नसल्याचे स्पष्ट करत, याउलट काही पदे कमी केली जातील अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
सध्याच्या उत्पादनांना आणि तंत्रज्ञानाच्या विकासास अधिक चांगल्या प्रकारे सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोइंगकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीकडून या वर्षी मुख्यतः वित्त आणि एचआरमध्ये २,००० कपात करण्यात येणार आहे. तसेच, भारतातील टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेसला त्यापैकी सुमारे एक तृतीयांश नोकऱ्या आउटसोर्स करणार असल्याची योजना आखली जात असल्याचे माहिती बोईंगकडून देण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या