संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

बोजेस यांच्या रॉकेटला अपघात! अवकाश पर्यटन पुन्हा धोक्यात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

टेक्सास- उद्योगपती जेफ बोजेस यांची कंपनी ब्लू ऑरिजनद्वारा आंतराळात प्रक्षेपीत करण्यात आलेल्या रॉकेटला सोमवारी अपघात झाला. त्यामुळे अवकाश पर्यटन पुन्हा एकदा धोक्यात आले. आंतराळात पाठविण्यात आलेल्या रॉकेटमध्ये कोणीही आंतराळ प्रवासी नव्हता. हे रॉकेट केवळ वैज्ञानिक संशोधन हेतूने पाठविण्यात आले होते. त्यामुळेकोणती जीवित हानी झाली नाही. हे रॉकेट क्रॅश झाल्याने अनेकांच्या आंतराळ पर्यटन स्वप्नाच्या मात्र ठिकऱ्या उडाल्या आहेत.

वैज्ञानिक संशोधनासाठी पाठविण्यात आलेले हे रॉकेट पश्चिम टेक्सास येथून आंतराळात प्रक्षेपीत करण्यात आले होते. रॉकेट अवकाशाच्या दिशेने निघाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच त्याच्या इंजिनामध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली. ज्यामुळे इंजिनच्या चहुबाजूंनी लाल, पिवळ्या रंगाच्या आगीच्या ज्वाळा पाहायला मिळाल्या. त्यानंतर तातडीने रॉकेटची आपत्कालीन प्रणाली कार्यान्वित झाली आणि रॉकेट अवघ्या काही मनिटांमध्येच जमीनीवर आले.

अमेरिकेच्या फेडरल एविएशन एडमिनिस्ट्रेशन सांगितले की, आंतराळाच्या दिशेने झेपावलेले रॉकेट समस्या निर्माण झाल्याने पुन्हा जमीनिच्या दिशेने वळले आणि कोसळले. अशा प्रकारचे रॉकेट लोकांना आंतराळात 10 मीनिटांची यात्रा करण्यासाठी वापरले जाते. घटनेची पूर्ण चौकशी होऊन निष्कर्ष येत नाहीत तोपर्यंत यापुढे अशा प्रकारच्या कोणत्याच रॉकेटचे प्रक्षेपण होणार नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami