मुंबई- ठाण्यातील आंबेडकर चळवळीतील ॲड. दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने आज ठाण्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत करताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी माध्यमांना सांगितले की, ‘एका बाजूला महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद पेटला आहे. मात्र महाराष्ट्राच्या बाजूने कुणीच बोलणार नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री मस्तीत आणि माज आल्यासारखे बोलत आहे. आमचे मुख्यमंत्री हे स्क्रिप्ट लिहून दिल्यासारखे वाचत आहे.`
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, बोम्मई यांना सोलापूर पाहिजे, अक्कलकोट पाहिजे, इतकी हिंमत होती कशी. केंद्रात भाजपचे सरकार आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये मिंधे असले तरी भाजपचेच सरकार आहे. दोन्ही नेत्याचे एकच नेते आहे. आपल्या मिंध्याचे नेते एकेकाळी बाळासाहेब होते, आता कोण मोदी आहे. बोम्मईंचा नेता मोदी आहे मग ते इतक्या जोरात बोलताय, मग हे गप्प का? तसेच निर्भया पथकातील वाहने शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जाणं हा अत्यंत नीच प्रकार आहे. निर्भया पथक कशासाठी नेमली गेली हे सर्वांना माहिती आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी तत्काळ मदत मिळावी, सरकार्य मिळावे, त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखले जावे, त्यासाठी ही पथकं तयार करण्यात आली होती. आज त्या पथकातल्या गाड्या आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येत असेल, तर त्यांची वृत्ती काय आहे, हे आता लोकांना कळले पाहिजे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली आहे. गेले दोन चार महीने रोज कोणाचा ना कोणाचा प्रवेश शिवसेनेत होतो आहे. एका जिद्दीने सर्व पेटलेले आहेत आता मी सत्तेत पण नाही तरी सुद्धा तुम्ही येत आहात. सत्तानारायण एक भाग आणि सत्तानारायण दुसरा भाग आहे. काही जणांना सत्तानारायण पावतो, तसेच 17 डिसेंबर रोजी महाराष्ट्र द्रोही यांच्या विरोधातील मोर्चा आहे. फूले- शाहू्ू-आंबेडकर आणि शिवरायाचा महाराष्ट्र आपण म्हणतो आणि त्यांचाच़ अपमान करणारा माणूस जर पंतप्रधानांचा बाजूला बसत असेल तर महाराष्ट्राने समजायचे काय असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.