संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

बोम्मई सरकारचा आदेश! कर्नाटकातील अल्पसंख्यक शाळांमध्येही हिजाब बंदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बंगळुरू – मौलाना आझाद सरकारी इंग्रजी माध्यमाच्या शाळेसह कर्नाटकातील सर्व अल्पसंख्यक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हिजाब बंदी लागू करण्यात आली आहे. तसा आदेश बोम्मई सरकारने काढला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा आदेश काढला असल्याचे सरकारने म्हटले आहे.

अल्पसंख्यक कल्याण विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या राज्यातील सर्व अल्पसंख्यक शाळांमध्ये हिजाब बंदी घातली आहे. तसा आदेश अल्पसंख्यक कल्याण विभाग व हज आणि वक्फ विभागाचे सचिव मेजर मणिवन्नन पी. यांनी काढला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार ही बंदी घातली असल्याचे त्यांनी आदेशात म्हटले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने शाळा आणि कॉलेजांमध्ये भगवी शाल, स्कार्फ आणि हिजाब परिधान करण्यास तात्पुर्ती बंदी घातली आहे. हायकोर्टाचा हा आदेश अल्पसंख्यंक कल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळा, महाविद्यालये आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही लागू आहे. त्यानुसार या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भगवी शाल, स्कार्फ आणि हिजाब परिधान करण्यास बंदी घातली आहे, असे बोम्मई सरकारने म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami