संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 06 February 2023

बोरघाटात कंटेनरची बसला धडक
बस चालकाचा मृत्यू, १८ जण जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

खोपोली- मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात झाला.मुंबईकडे येणाऱ्या लेनवर हा अपघात झाल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. खोपोलीजवळ बोरघाटात कंटेनरने या खाजगी बसला जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात १८ जण जखमी झाले असून यात बस चालकाचा मृत्यू झाला आहे.
या अपघातग्रस्त बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. ही बस सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका लग्नाला गेली होती. कोल्हापुर मार्गे ही बस वाशिंदला परतताना बोरघाटात बसला पाठीमागून कंटेनरने धडक दिली.अपघातस्थळी बचावकार्य करण्यासाठी आयआरबी,देवदूत,महामार्ग पोलिस आणि अन्य संस्थेची यंत्रणा दाखल झाली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अपघातातील ४ गंभीर जखमीना एमजीएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.तर ६ जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार चालू आहेत.१२ ते १२ किरकोळ जखमींना घटना स्थळावर प्राथमिक उपचार करण्यात आले.अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असल्याने तीनही लेन वरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami