पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट आणि दहावीची परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
दहावीच्या परीक्षेचा निकाल काल शुक्रवारी जाहीर झाला. त्यापूर्वी बारावीचा निकाल जाहीर झाला होता. या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यासाठी मंडळाने फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान १२ वीची आणि २७ जुलै ते १२ ऑगस्ट या काळात १० वीची परीक्षा होणार आहे. यामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी उपलब्ध झाली आहे.