संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

ब्राझीलमध्ये वादळ आणि पावसामुळे ११ जणांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ब्रासिलिया – मागील दोन दिवस झालेल्या भीषण वादळासह मुसळधार पावसामुळे ब्राझीलमध्ये ११ नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात ७ मुलांचा समावेश आहे. तर सुमारे ५०० कुटुंबांना त्यांच्या घरातून पलायन करावे लागले असल्याची माहिती येथील स्थनिक शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिले आहे.

तसेच ब्राझीलच्या साओ पाउलो राज्यात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे किमान १८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्यपाल जोआओ डोरिया यांनी दिली आहे. साओ पाउलो नगरपालिका फ्रँको दा रोचा यांनी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती नोंदवली असून ब्राझीलच्या दक्षिणेकडील साओ पाउलो राज्यात शनिवार व रविवारच्या वादळी पावसामुळे ११ प्रौढ आणि ७ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ५०० कुटुंबांना त्यांच्या राहत्या घरातून बाहेर पडावे लागले असून शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सिस्को मोराटो, फ्रँको दा रोचा, वार्झिया पॉलिस्टा, अरुजा आणि एम्बु दास आर्टेस या साओ पाउलोच्या महानगरपालिकेत आणि रिबेराव प्रेटो शहरात या मृत्यूची नोंद झाली आहे. अनेक कुटुंबांना त्यांची घरे सोडावी लागली. अनेक रस्ते आणि महामार्ग रोखण्यात आले आहेत. अति वेदनादायक म्हणजे शहरात संपूर्ण कुटुंबच्या कुटुंबे उद्ध्वस्थ झाली असल्याची माहितीदेखील समोर आली असून काही नवी जोडपी आणि काही कुटुंबातील लहान मुले, बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका वर्षाच्या बाळाचा समावेश असल्याचेदेखील समजते. तसेच फ्रॅन्को दा रोचा शहराला पूर आल्यामुळे जुकेरी नदी आणि रिबेराव युसेबिओ प्रवाह ओव्हरफ्लो झाल्यामुळे येथेदेखील अनेक घरे गाडली गेली असल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, साओ पाउलोचे राज्यपाल जोआओ डोरिया यांनी नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करत राज्यातील १० सर्वाधिक प्रभावित शहरे आणि ६४५ नगरपालिकांना जास्तीत जास्त मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami