लंडन – सध्या ब्रिटनमध्ये टोमॅटोची टंचाई भासत आहे. त्यामुळे सुपर बाजारात ग्राहकांच्या खरेदीवर मर्यादा घालण्यात आली आहे. टोमॅटोसह मिरची, काकडी, सॅलड बॅग,ब्रोकोली आणि फुलकोबीच्या खरेदीसाठी ३ पॅकची मर्यादा निश्चित केली आहे.
मॉरिसन कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितले की, त्यांनी टोमॅटो,काकडी आणि मिरचीच्या खरेदीवर प्रति ग्राहक २ वस्तूंची मर्यादा ठेवली आहे.दक्षिण युरोप आणि उत्तर आफ्रिकेतील खराब हवामानामुळे भाजीपाला उत्पादन कमी झाल्याने ब्रिटनमध्ये ही परिस्थिती उद्भवली आहे. ब्रिटन देश हिवाळ्यातील भाज्यांसाठी इतर देशांवर अवलंबून असतो.ब्रिटन डिसेंबरपासून मार्चपर्यंत ९५ टोमॅटो बाहेरील देशांतून आयात करत असतो.