संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

ब्रिटनमध्ये फेसबुकला ठोठावला 1 कोटी पाउंडचा दंड! 1 कंपनी विकावी लागणार

facebook, social media, communication-2815970.jpg
Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमेरिकेत एफटीसीने एकाधिकारशाहीच्या मुद्यावर खटला दाखल केल्यानंतर फेसबुकच्या युजर्समध्ये घसरण झाल्याचे समोर आले होते. त्याच्या परिणामी फेसबुकच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. त्यानंतर आता ब्रिटनमध्ये फेसबुकला मोठा धक्का बसला आहे. फेसबुकला, मेटा कंपनीला 15 कोटी पाउंडचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याशिवाय मेटाला आपली एक कंपनीदेखील विकावी लागणार आहे.

मेटा कंपनीने मे 2020 मध्ये 40 कोटी डॉलर खर्च करून अ‍ॅनिमेटेड इमेज प्लॅटफॉर्म खरेदी केला होता. मेटाकडून झालेल्या या व्यवहारानंतर कंपनीच्या डिजिटल जाहिरातींवर होणार्‍या परिणामांबाबत कल्पना दिली नव्हती. या गोष्टीला गंभीरपणे घेत ब्रिटनच्या कॉम्पिटिशन अ‍ॅण्ड मार्केट्स ऑथिरिटीने मेटा कंपनीला 15 कोटी पाउंडचा दंड ठोठावला. मेटा कंपनीने गिफी कंपनीचे संचलन करण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली नसल्याचे सांगितले. प्राधिकरणाने या गिफीची विक्री करण्याचे आदेश दिलेत. तर मेटाने या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. निकालावर नाराज असलो तरी आम्ही दंडाची रक्कम भरणार असल्याचे मेटाने म्हटले आहे. दरम्यान, सीएमएने याआधीदेखील फेसबुकला दंड ठोठावला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये फेसबुकला 5.5 कोटी पाउंडचा दंड ठोठावला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami