संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

ब्रिटनमध्ये हिंदू मंदिरांची तोडफोड! पाक विरोधात भारतीय आक्रमक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लंडन – ब्रिटनमध्ये इंडियन हाय कमिशनने इंग्लंडच्या लीसेस्टर शहरात भारतीय समुदायाविरुद्ध झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. तसेच या प्रकरणावर तातडीने कारवाई करण्याची आणि या हल्ल्यातील पीडितांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. लीसेस्टर शहरात पाकिस्तानी नागरिकांकडून हिंदू मंदिरांची तोडफोड करत मंदिरावरील भगवा झेंडा जाळून टाकला होता.त्यामुळे हे प्रकरण चिघळले आहे.गेल्या महिन्यात दुबईत झालेल्या भारत -पाकिस्तान दरम्यान झालेल्या आशिया चषक स्पर्धेनंतर झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आता ब्रिटनमध्ये उमटले आहेत.
याप्रकरणी आम्ही लीसेस्टर शहरातील भारतीय समुदायाविरूद्ध हिंसाचार आणि हिंदू मंदिराची तोडफोड केल्या प्रकरणाचा तीव्र निषेध करतो.” असे इंडियन हाय कमीशनने त्यांच्या जबाबात नोंदवले आहे. आम्ही हे प्रकरण यूके प्रशासनाकडे परखडपणे मांडले असून या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्यांवर त्वरित कारवाई करण्याची यूके प्रशानाकडे मागणीही केली आहे.सोशल मीडियावर एक व्हिडिओ मधे व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती काळ्या कपड्यांमध्ये मंदिराच्या इमारतीवर चढतो आणि इमारतीवर असलेला भगवा झेंडा उतरवतो. तर मंदिराची तोडफोड हिंदू आणि मुस्लीम समुदायांमध्ये झालेल्या वादादरम्यान करण्यात आली होती. हा वाद मागल्या महिन्यात झालेल्या ‘भारत पाकिस्तान एशिया कप क्रिकेट मॅच’मुळे झाला होता.२८ ऑगस्टला भारत पाकिस्तान मॅच नंतर हिंदू मुस्लीम समुदायांमध्ये वाद झाला होता. या वादात दोन्ही क्रिकेट मॅचवरून एकमेकांवर टीका टिपण्या केल्यात. यानंतर एका पक्षाच्या जमावाने मंदिराबाहेर गर्दी करत तोडफोड केली. लीसेस्टर पोलीसांनी या प्रकारणाचा तपास सुरू केला असून याप्रकरणात १५ लोकांना अटक करण्यात आली आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami