लंडन- मागील दोन वर्षांपासून ब्रिटनची अर्थव्यवस्था डबघाईला आळी असून ब्रिटनला महागाईचा जोरदार तडाखा बसू लागला आहे.ब्रिटनमध्ये साखर आणि दुधासह जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणवर वाढले असून सामान्य नागरिक हैराण झाला आहे.
ब्रिटनच्या अधिकृत सांख्यिकी संस्थेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांत दुधाच्या दरात तब्बल ४५ टक्के वाढ झाली आहे.तसेच साखरेचे दर ४२ टक्क्यांनी वाढले आहेत.ब्रिटनच्या नागरिकांचा सकाळी नाश्ताचा भाग असणाऱ्या अंड्यांचे दर २८ टक्क्यांनी वाढले आहेत. मागील वर्षभरात जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढत चालली आहे.अनेक सरकारी आणि खासगी संघटनांमध्ये कामगारांनी पगार वाढीसाठी आंदोलने सुरू केली आहेत. एकंदर कामगार क्षेत्रात सर्वत्र असंतोष पसरला आहे.मात्र नजिकच्या काळात देशातील या महागाईवर नियंत्रण आणले जाईल, त्यात सरकारला यश मिळेल अशी आशा अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.