भंडारा – गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातून आलेल्या 23 हत्तींच्या कळपाने भंडारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही मोठा धुमाकूळ घातला.या हत्तींच्या काळपापासून ग्रामस्थांना सुरक्षित ठेवण्याचा वनाधिकारी पूर्ण प्रयत्न करीत असेल तरी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे या हत्तींनी मोठे नुकसान केलेले आहे.
लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहळी या गावालगत हत्तींचा कळप पोहचला असून त्याचा आढावा घेतला आहे. या कळपात 23 छोट्या-मोठ्या हत्तींचा समावेश आहे. या कळपाने त्यांच्या मार्गात येणाऱ्या शेतीतून मार्ग काढताना मग ती उसाची शेती असो की, धनाची त्यांची अक्षरश: नासाडी केली आहे. हत्तींच्या या उच्छादामुळे ग्रामीण नागरिकही मोठ्या प्रमाणात भयभीत झालेले आहेत. रात्रीच्या सुमारास रस्ते सूनासान होत असून ग्रामस्थही 7 च्या आत घरात राहत आहे. वनविभाग लाऊडस्पिकरच्या माध्यमातून ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी जनजागृती करत आहेत. एखादे वाहन गावात पोहोचल्यावर भयभीत ग्रामस्थ त्या वाहनाभोवती जमा होऊन हत्तींची माहिती घेत आहेत.