संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

भरधाव एसटी बसची दुचाकीला धडक ! २ शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वर्धा – जिल्ह्यात अपघाताची एक भयंकर घटना घडली आहे.संत्रा बागेचे परमिट घेण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या दोन शेतकऱ्यांना भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिली. या धडकेत दोनही शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. रामदास भलावी आणि प्रल्हाद युवनाते अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.
रामदास भलावी आणि प्रल्हाद युवनाते हे दोघे संत्रा उत्पादक शेतकरी कारंजा येथील कृषी कार्यालयात संत्रा बागेचे परमिट घेण्यासाठी गेले होते.कृषी कार्यालयातून गावाकडे परत जातांना कारंजा घाडगे येथे राष्ट्रीय महामार्गवरील पेट्रोलपंपाजवळ भरधाव एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील रामदास भलावी याचा जागीच तर प्रल्हाद युवनाते याचा कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.याप्रकरणी कारंजा पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami