पिंपरी- चिंचवड विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजप, शिंदे गट, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम युतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पिंपळेगुरव ते थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली जाणार आहे.
त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि राज्यातील नेत्यांनी दोन दिवसांपासून विविध पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी केली. अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काढण्यात येणाऱ्या पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्यासह पक्षाचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.