मुंबई – गुरुवारपासून सुरु होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारला घेरण्यासाठी मुंबईत बुधवारी भाजप नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आणि भाजपचे मुंबईचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत राहणार असून ही बैठक झाल्यानंतर फडणवीस दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पक्षाची भूमिका मांडणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी 3 मार्चपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्यात आलेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिकांचा राजीनामा घेण्यावर भाजप नेते ठाम आहेत. ठाकरे सरकारला त्यांचा राजीनामा घेण्यास कसे भाग पाडता येईल, यावर देखील या बैठकीत भाजपचे नेते विचार करतील. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.