संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

भाजपच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी यांना वगळले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – भाजपने संसदीय मंडळात फेरबदल करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना वगळले आहे. त्यांच्याबरोबरच इतर काही सदस्यांनाही मंडळातून हटवले आहे. त्यामुळे आता भाजपच्या संसदीय मंडळात एकही मुख्यमंत्री नाही. ११ सदस्यांच्या या मंडळात पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा मंडळाचे अध्यक्ष आहेत. याशिवाय पक्षाच्या निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीस यांचा समावेश केला आहे.

भाजपने आपल्या संसदीय मंडळात मोठे फेरबदल केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांना त्यातून वगळले आहे. त्यामुळे आता मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरुप्पा, सर्वानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, भाजपचे संघटन महामंत्री बी. एल. संतोष हे ११ सदस्य आहेत. भाजपने नवी निवडणूक समिती स्थापन केली आहे. त्यात १५ सदस्यांचा समावेश आहे. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा या समितीचे अध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, सोनोवाल, के. लक्ष्मण आदींचा त्यात समावेश आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami