संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

भाजपच्या सहलीसाठी गेलेल्या नगरसेविका काशीबाई पवार यांचे हृदयविकाराने निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी एक धक्कादायक घटना घडली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी सहलीत गेलेल्या भाजप नगरसेविकेचा मृत्यू झाला आहे. मुक्कामी असलेल्या हाॅटेलमध्ये नगरसेविकेला काल सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला.

सुरगाणा नगरपंचायतीत वार्ड क्रमांक १६ मधून नगरसेविका काशीबाई पवार निवडून आल्या होत्या. नगराध्यक्ष पदाची निवडणुक उद्या १५ फेब्रुवारी तारखेला आहे. त्या अगोदर दगाफटका नको म्हणून भाजपने नगरसेवकांची सहल काढली होती. निवडणुकीच्या ऐनवेळी अगोदर येऊन बहुमत जाहीर करण्याचा भाजपचा कल होता. मात्र, वापी येथे एका हॉटेलमध्ये थांबले असताना नगरसेविका काशीबाई पवार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami