भोपाळ:- महाराष्ट्रा काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मध्यप्रदेश काॅंग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे तिरंगा सोपवला आणि भारत जोडो यात्रेने अधिकृतपणे मध्यप्रदेशात प्रवेश केला.मध्यप्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यातील बोदरली गावातून यात्रेला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेश हे भाजप शासित राज्य असल्याने सुरूवातीला जरी गर्दी असली तरीही शेवट पर्यंत हीच गर्दी राहणार का? त्यामुळे भारत जोडो यात्रेची खरी कसोटी मध्यप्रदेशात लागणार आहे.
भारत जोडो यात्रेता पहिल्यांदा हिंदी भाषिक राज्य पोहचली आहे. त्यामुळे या यात्रेला मिळणारा प्रतिसाद महत्वाचा ठरणार आहे. तसेच मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. दक्षिणसह महाराष्ट्रात या यात्रेला जो प्रतिसाद मिळाला, तोच प्रतिसाद राहुल गांधी यांना कायम राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे. दरम्यान मध्यप्रदेशात यात्रा पोहचताच आदिवासी बांधवानी राहुल गांधी यांचे जोरदार स्वागत केले. तसेच राहुल गांधी यांनी आदिवासी बांधवांना भेटून गेल्यानंतर त्यांच्या पारंपारिक गायनात पदयात्रेतील लोकांनी सहभाग घेतला. मध्य प्रदेशात, भारत जोडो यात्रा १३ दिवसात सुमारे ३८२ किमी अंतर पार करणार असुन पाच जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे.