संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

भाजपाच्या स्टार प्रचारक बबीता फोगाट यांच्या ताफ्यावर उत्तर प्रदेशात हल्ला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनऊ – एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या कारवर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या स्टार प्रचारक कुस्तीपटू बबीता फोगाट यांच्या ताफ्यावर मेरठमध्ये जमावाने हल्ला केला. मात्र त्यात त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एमआयएमचे खासदार ओवैसी यांच्या कारवर काही दिवसांपूर्वीच गोळीबार झाला होता. उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. त्यानंतर आता भाजपाच्या स्टार प्रचारक बबीता फोगाट यांच्या ताफ्यावर मेरठच्या दबुथुआ गावात जमावाने हल्ला चढवल्याची घटना घडली. त्यात त्यांना कोणतीही इजा झाली नसली तरी यामुळे तेथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय लोकदलाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला चढवल्याचा आरोप स्थानिक भाजपाच्या नेत्यांनी केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami