संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

भाजपातील गळती रोखण्यासाठी अमित शहा यांची १० तास खलबत

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच, भाजपात जी फाटाफूट सुरु झालेली आहे ती रोखण्यासाठी, तसेच प्रचाराची पुढील रणनीती ठरवण्यासाठी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपा कोअर कमेटीची बैठक बोलावली होती. या बैठकीत तब्बल १० तास खलबते करण्यात आली. यात भाजपला लागलेली गळती रोखणे, तसेच समाजवादी पक्षालाही कशा प्रकारे धक्का द्यायचा, यावरही चर्चा करण्यात आली.

योगी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि काही आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आणखी काही मंत्री आणि आमदार पक्षातून बाहेर पडणार आहेत. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. त्यामुळे आता स्वतः अमित शहा यांनी निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. त्यासाठीच त्यांनी आज कोअर कमेटीची बैठक बोलावली होती. या बैठकीत अमित शहा यांनी उत्तर प्रदेशातील सहा क्षेत्रांचा आढावा घेतला. खास करून मौर्य यांच्या प्रभाव क्षेत्रात भाजपची स्थिती काय आहे याची माहिती घेतली. त्यानंतर मौर्य यांच्या संपर्कातील आमदारांची कशा प्रकारे समजूत काढता येईल यावर चर्चा केली. कारण भाजपचे आणखी जे १३ आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, त्यांना रोखण्यासाठी काय करायला हवे. त्यांच्या काय मागण्या आहेत. त्या समजून घ्या असे अमित शहा यांनी आपल्या सहकार्यांना सांगितले.

तसेच कोरोनामुळे जाहीर प्रचारावर निर्बंध आल्याने, पुढील प्रचार कशा प्रकारे करायचा यावर सविस्तर चर्चा झाली. आणि मुख्य म्हणजे समाजवादी पक्षावर पलटवार करण्यावरही या बैठकीत चर्चा झाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami