धुळे – भाजपाला कुख्यात माफिया इक्बाल मिरचीच्या कंपनीकडून दहा कोटी रुपयांची देणगी मिळाली असल्याचा खळबळजनक आरोप धुळे शहराचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी केला आहे.
अनिल गोटे यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच अश्लील व्हिडीओ तयार करणारे राज कुंद्रा, रणजित बिंद्रा, दाऊदचा उजवा हात असलेला इक्बाल मिरची हे सर्व एकाच माळेचे मणी व भाजपचे देणगीदार असल्याचा देखील उल्लेख प्रसिद्धीस दिलेल्या परिपत्रकात केला आहे. त्याचबरोबर देशद्रोही अतिरेक्यांच्या टोळीपासून भाजपने काय मिळविले देणगी की खंडणी म्हणत गोटे यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांसमोर खळबळजनक प्रश्न उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला आहे.