संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

भाजपा आ. देवराव होळी यांच्या वाहनाला अपघात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

गडचिरोली- गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. गडचिरोली येथून आरमोरी तालुकास्थानी दुर्गादेवी दर्शनासाठी जात असताना अपघात झाला. येथील गाढवी नदीच्या पुलावर ऐन मधोमध दुचाकीस्वाराला वाचविताना गाडी ट्रकला धडकली, त्यामुळे भीषण अपघात झाला. गाडीमधील एअर बॅग योग्य वेळी उघडल्याने आमदार डॉ. देवराव होळी आणि त्यांचे सहकारी सुखरूप वाचले. मात्र अपघातात दुचाकीस्वार गंभीर झाला आहे.

आमदार डॉ. देवराव होळी हे गडचिरोली येथून आरमोरी तालुकास्थानी दुर्गादेवी दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. गाढवी नदीच्या पुलावर दुचाकीस्वाराला वाचविताना गाडी ट्रकला धडकली. गाडीतील एअर बॅग योग्य वेळी उघडल्याने आमदार होळी व त्यांचे सहकारी सुखरूप आहेत. मात्र अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अद्याप दुचाकीस्वाराचे नाव व वास्तव्य कळू शकलेले नाही. अपघात होताच डॉ. देवराव होळी यांनी रुग्णवाहिका बोलावून अपघातग्रस्त युवकाला स्वतः मदत पोहोचविली. आरमोरी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami