पुणे – शनिवारी पुणे महापालिकेत शिवसैनिकांनी राडा करत भाजपा नेते किरीट सोमय्या यांना रोखले होते. तसेच यावेळी सोमय्या यांना धक्काबुक्कीही केली होती. या गदारोळात किरीट सोमय्या हे महापालिकेच्या पायर्यांवर पडले होते. यात दुखापत झाल्याने त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सोमय्या यांना उपचारानंतर संचेती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून दुपारी 1 वाजता ते मुलुंड निलम नगर येथील निवासस्थानी दाखल झाले होते.
पुण्यातील संचेती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 6, 2022
पुणे महापालिकेत जाऊन संजय राऊत कौटुंबिक भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध कोविड सेंटर्स घोटाळ्यांबाबत तक्रार दाखल केली
माफिया सेना मला ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही pic.twitter.com/iN77lhb6eH
किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पुण्यातील संचेती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. पुणे महापालिकेत जाऊन संजय राऊत कौटुंबिक भागीदार सुजीत पाटकर लाईफलाईन मॅनेजमेेंट सर्व्हिसेस विरुध्द कोविड सेेंटर्स घोटाळ्याबाबत तक्रार दाखल केली. शिवसेना आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे माफिया, मला ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून कोणी रोखू शकत नाही.
8 Shivsena Leaders including Pune President Sanjay More to be arrested by Police for Assaulting Me. .
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 6, 2022
FIR registered, IPC Section charged 143, 147, 149, 341, 336, 337, 323, 504, 37(1), 135 @BJP4Maharashtra @BJP4India @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/2xPfuSZVhL