संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 07 December 2022

भाजप मतमोजणीत हेराफेरी करु शकतो, राकेश टिकैत यांचा आरोप

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनऊ – यूपीमध्ये सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज ७ मार्च रोजी पार पडणार आहे. या मतदानापूर्वी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोठं वक्तव्य केले असून, मतदानानंतर ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी सावध राहण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये सहा टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडणार आहे. या मतदानापूर्वी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोठे वक्तव्य करत, भाजप मतमोजणीत हेराफेरी करुन निवडणुकीत पराभूत होणाऱ्या उमेदवारांना विजयी करु शकते असा आरोपच राकेश टिकैत यांनी केला आहे. हारलेल्या उमेदवारांना भाजप विजयी करु शकते असे टिकैत म्हणाले आहेत. मतदानानंतर ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी सावध राहण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. मतमोजणीत भाजप अफरातफर करण्याचा संशय राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे. तसेच अप्रामाणिकपणाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात किमान ७० जागा जिंकण्याची भाजपची तयारी सुरु असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. येत्या 10 मार्चला पाच रज्यातील मतमोजणी होणार आहे.

मतमोजणीत मोठ्या प्रमाणात अप्रामाणिकता होण्याची भीती राकेश टिकैत यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मतमोजणी होण्याच्या आदल्या दिवशी मतदारांनी आणि शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.अफरातफर करुन उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी एका उमेदवारावर देण्यात आली असल्याचा आरोपही यावेळी टिकैत यांनी केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami