संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

भायखळा स्थानकात तांत्रिक बिघाडमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई: – तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. साडेबारा नंतर भायखळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दिशेने जाणाऱ्या जलद आणि धीम्या सर्व लोकल एका मागोमाग उभ्या राहिल्या होत्या.ओव्हरहेड वायरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे मध्य रेल्वेकडून ट्विटरवर स्पष्ट करण्यात आले आहे.सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावर हा बिघाड झाला होता. त्यामुळे या मार्गावरील सर्व धीम्या गतीच्या लोकल जलद गतीच्या मार्गावरून धावत होत्या. त्यामुळे त्या उशीराने धावत असल्याचंही मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले तसेच, सीएसटीकडे जाणाऱ्या काही धीम्या लोकल दादर, कुर्ला, परेलपर्यंतच चालवण्यात आल्या होत्या. मध्य रेल्वेची लोकल रेल्वा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा मनस्ताप सहन करावा लागला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami