संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

भारताच्या परकीय गंगाजळीत मोठी घट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – भारताच्या परकीय चलन साठ्यात घट झाली असल्याचे समोर आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलनसाठा १,४९४ अब्ज डॉलर्सने घसरून ५७५.२६७ अब्ज डॉलर्सवर आला आहे.आरबीआयचा हस्तक्षेप आणि आयात केलेल्या वस्तूंच्या किंमतीत झालेली वाढ यामुळे परकीय गंगाजळीत घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.
रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीमध्ये असे नमूद केले आहे की, महत्वाची बाब म्हणजे याच घसरलेल्या परकीय गंगाजळीत सलग तीन आठवडे वाढ झाल्याचे दिसून आले होते.मागील महिन्यात २७ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनसाठा ३.०३ अब्ज अमेरिकन डॉलर्सने वाढून तो ५७६.७६१ अब्ज डॉलर्स इतका झाला होता. तर भारताची परकीय चलन मालमत्ता १.३२३ अब्ज डॉलर्सने घसरून ५०७.७६१ अब्ज डॉलर्सवर स्थिरावली आहे.दुसरीकडे सोन्याच्या साठ्यातही घट झाल्याचे दिसून आले आहे.सोन्याचा साठा २४६ दशलक्ष डॉलर्सने घसरून ४३.७८१ अब्ज डॉलर्स झाला आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षात २०२२ मध्ये परकीय चलन साठा साधारण ६३३ अब्ज डॉलर्स इतका होता. तर त्याच्या आधी म्हणजे २०२१ मध्ये हाच परकीय चलन साठा तब्बल ६४५ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या