संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

भारताच्या पॉलची गोल्डन जम्प

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बर्मिंगहॅम- ट्रीपल जंपमध्ये भारताने इतिहास रचला आहे. भारताच्या एल्डहॉस पॉल याने सुवर्ण तर अब्दुल्ला याने रौप्य पदक पटकावले आहे. त्यामुळे आता भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 16 झाली आहे.
एल्डहॉस याने ट्रीपला जंपमध्ये 17.03 मीटर अंतर पार करीत प्रथम क्रमांक पटकावला तर अब्दुल्ला अबूबेकर याने 17. 02 मीटर अंतर पार करीत रजत पदक पटकावले आहे. भारताच्या शरद चितळे याचे कांस्यपदक मात्र हुकले आहे. अन्यथा या स्पर्धेतील तिन्ही पदक भारताला मिळाली असती. विशेष म्हणजे या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणार्‍या पॉलचे हे सर्वश्रेष्ठ व्यक्‍तिगत प्रदर्शन आहे. सुवर्णपदक जिंकल्यामुळे पॉलने आनंद व्यक्त करीत या स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली याबद्दल समाधान व्यक्त
केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami