भारतात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक, नव्या आकडेवारीतून बाब उघड

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्व्हे (एनएचएफएस) यानुसार देशामध्ये आता महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त झाली असल्याची दिसून आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये आतापर्यंत १ हजार पुरुषांमागे १०२० महिला आहेत. प्रजनन दरामध्ये घट झाल्याचे या सर्वेक्षणामध्ये सांगितले आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीवरुन हे स्पष्ट झाले आहे की, आता देशामध्ये महिलांची संख्या सतत वाढत आहे. याअगोदर परिस्थिती काही वेगळी होती. 1९९० मध्ये दर १ हजार पुरुषांमागे फक्त ९२७ महिला होते. २००५- ०६ मध्ये झालेल्या तिसऱ्या एनएचएफएस सर्वेक्षणामध्ये १ हजार – १ हजारची बरोबरी झाली होती. यानंतर २०१५-१६ मध्ये चौथ्या सर्वेक्षणामध्ये ही आकडेवारी परत घसरली होती. एक हजार पुरुषांच्या तुलनेमध्ये ९९१ महिला होते. पण आता पहिल्यांदा महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त झाले आहे.

देशातील ७८.६ टक्के महिला त्यांचे बँक खाते चालवत आहेत. २०१५-१६ मध्ये हा आकडा केवळ ५३ टक्के इतका होता. त्याचवेळी ४३.३ टक्के महिलांच्या नावावर काही मालमत्ता आहे, तर २०१५-१६ मध्ये हा आकडा केवळ ३८.४ टक्के इतका होता. मासिक पाळीच्या काळामध्ये सुरक्षित स्वच्छता उपायाचा अवलंब करणाऱ्या महिलांचे प्रमाण ५७.६ टक्क्यांवरुन ७७.३ टक्केपर्यंत येऊन वाढले आहे. तर, लहान मुले आणि महिलांमध्ये अशक्तपणा हा एक प्रमुख चिंतेचा विषय झाला आहे. १५ ते ४९ वयोगटात ६७.१ टक्के मुले आणि ५७ टक्के स्त्रिया अशक्तपणामुळे ग्रस्त आहेत.

Close Bitnami banner
Bitnami