संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

भारतात बेरोजगारीचे भीषण संकट ऑक्टोबरमध्ये बेरोजगारी दर वाढला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – भारतात दिवसेंदिवस बेरोजगारीचे संकट भीषण बनत चालले आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये बेरोजगारी वाढली आहे.सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने याबाबतची आकडेवारी जारी केली आहे. एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले असताना, दुसरीकडे देशातील बेरोजगारीचा दरही उचांकीवर पोहोचला आहे.
ऐन सणासुदीच्या काळात लोक बरोजगार झाल्याची माहिती केंद्र सरकारच्या आकडेवारीमधून समोर आली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर पेक्षा ऑक्टोबरमध्ये बेरोजगारी दर वाढला आहे. १९ ऑक्टोबरपर्यंत देशातील बेरोजगारी दर ७.८६ टक्के इतका नोंदवला गेला आहे.
तर सप्टेंबरमध्ये हाच बेरोजगारी दर ६.४३ टक्के इतका होता.त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात लोकांच्या हातचे काम गेल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे ग्रामीण भारतात बेरोजगाराचे प्रमाण शहरी भागा पेक्षा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही चिंतेची बाब मानली जात आहे.मागील सात महिन्यातील ग्रामीण भागातील बेरोजगारी दर एप्रिल ७.१८,मे ६.६३ टक्के, जून ८.०७ टक्के,जुलै ६.१७ टक्के,ऑगस्ट ७.६८ टक्के, सप्टेंबर ५.८४ टक्के, ऑक्टोबर ८.०१ टक्के इतका आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami