नवी दिल्ली – भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या १६ हजार ६७८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २६ रुग्णांचा मृत्यू झाला. तर १४ हजार ६२९ रुग्ण संसर्गमुक्त झाले. तसेच रविवारी दिवसभरात महाराष्ट्रात २ हजार ५९१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली.
आकड्यांवरून दिसून येते की, देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना संसर्गात घट झाली, परंतु वाढलेली सक्रिय रुग्णांची संख्या चिंतेचे कारण बनली आहे. सक्रिय रुग्णांचा आलेख मात्र चढतानाच दिसत आहे. देशात सध्या १ लाख ३० हजार ७१३ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे, आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काल एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तसेच २ हजार ८९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यासह राज्यात आजपर्यंत एकूण ७८ लाख ३७ हजार ६७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९२% एवढे झाले आहे.
#COVID19 | India reports 16,678 fresh cases, 14,629 recoveries and 26 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) July 11, 2022
Active cases 1,30,713
Daily positivity rate 5.99% pic.twitter.com/A2M7HQprWW