संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

भारताला मिळाली सिंगल डोसवाली स्पुतनिक लाइट कोरोना लस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – आता देशात सध्या सुरू असलेल्या कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहिमेला आणखी बळकटी मिळणार आहे. या महामारी विरोधातील लढ्यात भारताला आणखी एका लसीचे सामर्थ्य लाभले आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने केवळ एकच डोस पुरेसा असलेल्या स्पुतनिक लाइट या कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे.

डीसीजीआयच्या तज्ज्ञांच्या समितीने या लसीचा भारतात आपत्कालीन वापर करण्याबाबत शिफारस केली होती. त्याला अनुसरून डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. ही लस भारतातील कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील नववी कोरोना लस असेल. मात्र नऊही लसींमध्ये स्पुतनिक लाइट ही एकमेव सिंगल डोसवाली लस आहे. त्यामुळे या लसीचा एक डोस कोरोनाचा प्रतिकार करणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काल रविवारी ट्विटरवरून ही खुशखबर दिली. या लसीच्या वापरामुळे कोरोना महामारी विरोधातील सामूहिक लढ्याला आणखी बळकटी मिळेल, असे ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांनी केले आहे.

“डीसीजीआयने भारतात सिंगल-डोसवाल्या स्पुतनिक लाइट लसीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी दिली आहे. देशातील ही नववी कोविड-१९ प्रतिबंधक लस आहे. यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाविरुद्ध देशाच्या सामूहिक लढ्याला आणखी बळ मिळेल,” असे आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालली आहे. मात्र नव्या व्हेरिएंटच्या शिरकावाची भिती कायम आहे.या पार्श्वभूमीवर सरकारकडून लसीकरणावर भर देण्यात येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami