भारताला विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद अडकला लग्नाच्या बेडीत!

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई -भारताला आपल्या नेतृत्वाखाली अंडर-१९ विश्वचषक जिंकून देणारा फलंदाज उन्मुक्त चंद हा विवाहबंधनात अडकला आहे. प्रसिद्ध फिटनेस आणि न्यूट्रीशन कोच सीमरन खोसला हिच्यासोबत उन्मुक्त चंदने लगीनगाठ बांधली. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत उन्मुक्त चंद याने आपल्या चाहत्यांना माहिती दिली. उन्मुक्त चंद आणि सीमरन खोसला गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. काल रविवारी अखेर या दोघांनी लगीनगाठ बांधली. उन्मुक्त चंद आणि सीमरन खोसला यांच्या लग्नाला फक्त मोजक्याच लोकांची उपस्थिती होती.

उन्मुक्त चंदला क्लीन बोल्ड करणारी सीमरन खोसला व्यवसायाने फिटनेस आणि न्यूट्रीशन कोच आहे. सिमरन खोसला यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरून त्यांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.आज आपण कायमचे एक होण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी एका छायाचित्रात लिहिले आहे.क्रिकेटपटू उन्मुक्त चंद याने याचं वर्षी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

उन्मुक्तने भारताला १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकून दिला होता. २०१२ साली झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक संघाचा कर्णधार होता आणि अंतिम सामन्यात १११ धावांची नाबाद खेळी केली होती. स्थानिक क्रिकेटमध्ये उन्मुक्त दिल्ली आणि उत्तराखंड या संघांकडून देखील खेळला आहे.

आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. मात्र त्याला तिथे म्हणावे असे यश मिळाले नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १२० सामन्यात दमदार फलंदाजी करत उन्मुक्तने ४१.३३ च्या सरासरीने ४५०५ धावा केल्या आहेत. यात सात शतक आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. 

Close Bitnami banner
Bitnami