संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे गॅम्बियात चक्क ६६ मुलांचा मृत्यू?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*डब्लूएचओच्या अलर्टनंतर चौकशी सुरू

बांजुल – मेसर्स मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेड ऑफ इंडिया या हरियाणातील औषध कंपनीने लहान मुलांसाठी तयार केलेल्या सर्दी-खोकल्याच्या औषधामुळे पश्चिम आफ्रिकन देश गॅम्बियात ६६ मुलांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर जागतिक आरोग्य संघटनेने औषध वापराबाबत अलर्ट जारी केला आहे. कंपनीच्या ४ औषधांचे नमुने तपासले. त्यात डायथिलिन ग्लायकोल आणि इथिलिन ग्लायकोल हे घटक आढळले. औषधांत त्यांचा वापर करता येत नाही. त्यामुळे किडनीशी संबंधित आजारी मुलांचा मृत्यू होऊ शकतो, असे मत डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांनी व्यक्त केले. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर केंद्र सरकारने याची चौकशी सुरू केली आहे.
लहान मुलांच्या सर्दी-खोकल्यासाठी मेडेन फार्मासिटिकल्स लिमिटेडने ४ औषधांची निर्मिती केली आहे. त्यात मान्यता नसलेल्या घटकांचा वापर केला आहे. त्यामुळे गॅम्बियात ६६ मुलांचा मृत्यू झाला. अशाच घटना इतर देशांमध्ये घडू शकतात. त्यामुळे या औषधांच्या वितरणाला डब्ल्यूएचओने मनाई केली आहे. या उत्पादनांच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यानुसार भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या कफ सिरपच्या चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था याचा तपास करत आहे. हरियाणा नियमक प्राधिकरणाकडे हा तपास सोपवला आहे. हरियाणाच्या सोनीपत येथील मेसर्स मेडेन फार्माची ते चौकशी करत आहेत. कंपनीने गॅम्बियाला औषधे निर्यात केल्याचे आढळले आहे. या औषधात विषारी घटक असल्यामुळे पोटात दुखणे, उलट्या, अतिसार, मूत्रपिंडाचा त्रास, डोकेदुखी, किडनीचा त्रास, मेंदूवर परिणाम, असा त्रास मुलांना होतो. त्यातून त्यांना जीवघेणा आजार जडू शकतो. म्हणून या कंपनीच्या उत्पादनांची चौकशी करण्याचे आदेश डब्ल्यूएचओने दिले आहेत. त्यानुसार कंपनीच्या औषधांची तपासणी आणि चौकशी सुरू आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami