संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 07 February 2023

भारतीय नोटांवर महात्मा गांधींचाच फोटो! केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर गणपती आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावण्याची मागणी केली होती.संसदेत या मागणीबाबत विचारले असता यावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.चलनी नोटांवरुन महात्मा गांधी यांची प्रतिमा हटवण्यात येणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसभेत चलनी नोटेवरील प्रतिमेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर देताना सांगितले की, सरकारकडे देवी-देवतांसह प्रतिष्ठित व्यक्ती, प्राण्यांचे फोटो चलनी नोटांवर छापण्याबाबत मागणी करण्यात आली होती. आरबीआय कायदा 1934 मधील कलम 25 अंतर्गत, बँक नोट डिझाइन, फॉर्म आणि सामग्रीच्या वापराबाबत आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या शिफारशीनंतर सरकारकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे, त्यानंतरच बदल शक्य आहेत असे त्यांनी म्हटले.मात्र महात्मा गांधी यांचा चलनी नोटांवरून चलनी फोटो वगळण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच पंकज चौधरी यांनी सांगितले की, 6 जून 2022 रोजी आरबीआयने निवेदन जारी करत सध्याच्या चलनी नोटांमध्ये कोणताही बदल करण्याचा अद्याप प्रस्ताव नसून महात्मा गांधी यांचा फोटो हटवण्यात येणार असल्याचे वृत्तही आरबीआयने फेटाळून लावले होते. 

दरम्यान ज्यावेळी केजरीवाल यांनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीच्या फोटोची मागणी केली होती. त्यावेळेस राजकारण तापले होते.त्यावेळी भाजप नेत्यांनीही नोटांवर छत्रपती शिवरायांची प्रतिमा असण्याची मागणी केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami