वेलिंग्टन- न्यूझीलंड दौर्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अपयशामुळे भारतीय संघात निराशा पसरली आहे. आता चौथा सामना जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे कप्तान मिताली राज हिने सांगितले. तिसर्या एकदिवशीय सामन्यात न्युझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारतीय महिलांनी याचा फायदा घेत दमदार अर्धशतकी भागीदारी केली. शेफाली वर्माने 57 चेंडूत 51 धावा केल्या तर मेघनाने 41 चेंडूत 61 धावा केल्या. मधल्या फळीतील दीप्ती शर्मा हिनेही 69 धावा केल्या त्यामुळेच भारताला 279 धावा करता आल्या तर सलामीच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवल्याने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण मधल्या फळीतील एमी केअर 6 7, आणि एमी स्टॅर्थवेत 59 यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला त्यानंतर केटी 35 आणि लोरेण डाऊन 64 यांच्यासह तळाच्या खेळाडूंनी भारतीय गोलंदाजीचा चिवटपणे सामना करून विजयासाठी आवश्यक असलेले टार्गेट गाठले आणि भारताचा न्यूझीलंड महिला संघाने तीन विकेट ने पराभव केला त्यामुळे भारताने 5 एकदिवशीय सामन्यांची ही मालिका गमावलेली आहे.