संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

भारतीय शेअर बाजार उघडताच मोठी घसरण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आज भारतीय शेअर बाजार उघडताच मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 1000 अंकांनी, तर निफ्टी 290 अंकांनी घसरले.

बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्हीमध्ये प्री मार्केट ओपनिंगमध्येच मोठी घसरण होणार असल्याचे संकेत देत होते. प्री मार्केट ओपनिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 1200 अंकांनी खाली दाखवत होते आणि जेव्हा बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्सची सुरुवात 999 अंकांच्या घसरणीसह झाली. त्यानंतर पुढील काही मिनिटांतच सेन्सेक्सने 150 अंकांनी रिकव्हरीसुद्धा केली पण 9.20 वाजता पुन्हा सेन्सेक्स जवळपास 990 अंकांनी सुरू झाला. त्यानंतर 56,700 अंकांवर सेन्सेक्स ट्रेंड करत आहे. याचप्रमाणे निफ्टीची सुरुवातही 300 अंकांच्या घसरणीसह झाली. त्यामुळे निफ्टी 17 हजारांच्या खाली सध्या ट्रेंड करत आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असून त्याचा परिणाम संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसून येत आहेत. भारतीय शेअर बाजारात झालेली मोठी घसरण त्याचाच एक भाग असल्याचे म्हटले जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami